Wednesday, 25 May 2016

संग्रही ठेवा
: सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
👉३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
👉४. जात पडताळणी बाबतची नोंद.
👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
👉१५. नाव बदलाची नोंद.
👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
👉१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
👉२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
👉२५. रजा प्रवास सवलत नोंद.
👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
👉२८. सेवा पडताळणीची नोंद.
👉२९. जनगणना रजा नोंद.
👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
👉३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट

Saturday, 7 May 2016

क्लाउड स्टोरेज

क्लाउड स्टोअरेज
,
 क्लाऊड कॉम्प्युटिंग हे मोबाइल
आणि कॉम्प्युटरचं जीवन आहे, असं
विधान आजकाल आपल्याला सहज
ऐकायला मिळत. तसा क्लाऊड
कॉम्प्युटिंगचा गेल्या काही वर्षांत
लोकांमध्ये बऱ्यापैकी प्रसार झाला
आहे. परंतु अजूनही बऱ्याच लोकांना
क्लाऊड म्हणजे काय, याची फारशी
माहिती नसते. उंच पर्वतांवर
ढगांमध्ये तुमचा लॅपटॉप घेऊन बसणे
म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग का?
किंवा मग रॉकेट किंवा विमानात
बसून कॉम्प्युटिंग करणे म्हणजे
क्लाऊड कॉम्प्युटिंग का? आपण
क्लाऊड कीबोर्डवर प्रत्यक्षात
टाइप करू शकतो का? याचा
आपल्याला काही उपयोग होऊ
शकतो का, असे अनेक प्रश्न
आपल्या मनात येणे साहजिक आहे,
म्हणूनच जाणून घेऊ या आपल्याला
क्लाऊड कॉम्प्युटिंग सुविधा कशा
प्रकारे वापरता येऊ शकते? कोणती
सुविधा वापरावयाची? क्लाऊड
कॉम्प्युटिंग म्हणजे काय?
क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे
आपल्या गरजेची माहिती दूरच्या
कोणत्या तरी कॉम्प्युटरवर
साठवणे जी माहिती आपल्याला
कधीही जगाच्या कुठल्याही
कोपऱ्यातून सहजरीत्या मिळवता
येऊ शकते. क्लाऊड म्हणजे तो
दूरवरचा कॉम्प्युटर आणि त्या
कॉम्प्युटरशी म्हणजेच क्लाऊडशी
कनेक्ट होण्यासाठी बऱ्याचदा
फक्त इंटरनेट असले की पुरेसे ठरते.
याचे साधे-सोपे उदाहरण म्हणजे
जी-मेल, गुगल ड्राइव्ह,
ड्रॉपबॉक्स.. यावर आपण आपली
माहिती टाकून जतन करून ठेवू
शकतो.
क्लाऊड काम कसे करते.?
क्लाऊडचे कार्य समजावून
घेण्यासाठी एक उदाहरण बघू या.
आपल्या सगळ्यांकडे इलेक्ट्रिसिटी
आहे. पण वीज तयार करणारे
मोठमोठे टर्बाइन्स, मॅग्नेट्स, तारा
आपल्या घरात असण्याची
आपल्याला गरज नसते. कारण
आपल्या घरात येणारी वीज
आपल्याला तयार करावी लागत
नाही. ती आपल्यासाठी कुणी तरी
दूरवर तयार करतो आणि
आपल्यापर्यंत पोहोचवितो आणि
त्या बदल्यात आपण त्याला योग्य
तेवढे पैसे मोजतो. आता हीच गोष्ट
कॉम्प्युटरला लागू करा. तुमच्या
कॉम्प्युटरला लागणारी मेमरी ही
तशी अपुरी पडणारी गोष्ट असते
आणि त्यांची पोर्टेबिलिटीसुद्धा
मर्यादित असते. म्हणजे घरच्या
कॉम्प्युटरमध्ये साठविलेला डेटा
आपल्याला ऑफिसमध्ये
पाहावयाचा असेल तर पेन
ड्राइव्हसारखे हार्ड ड्राइव्ह घेऊन
फिरावे लागते. शिवाय या गोष्टी
बॅगेमधली जागा अडवून ठेवतात.
परंतु आता तेच काम क्लाऊड
तुमच्यासाठी करेल. म्हणजे तुमचा
सगळा महत्त्वाचा डेटा दूर कुठे तरी
स्टोअर होईल. तो इंटरनेट आणि
तुमचं युजरनेम आणि पासवर्ड
वापरून तुम्हाला कुठूनही मिळवता
येईल. तुम्ही पाठविलेला डेटा जगभर
पसरलेल्या सिक्रेट रो हाऊसमध्ये
स्टोअर होतो. तुमची माहिती
कुठल्या रो हाऊसमध्ये आहे हे
सांगणं जरा मुश्कील असतं, कारण
तो एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी
सेव्ह केला जातो. आणि तुमच्या
मागणीनुसार ती कुठेही मिळवता येऊ
शकते.
क्लाऊड कॉम्प्युटिंगचा उपयोग
काय?
तसे याचे फायदे बरेच असतात.
समजा तुमच्या एखाद्या फॅमिली
फोटोची एकच कॉपी तुमच्या
कॉम्प्युटरवर असेल आणि काही
कारणास्तव तुमचा कॉम्प्युटर बंद
पडला किंवा तुमचा फॅमिली फोटो जर
कायमचा डिलीट झाला तर तुमच्या
आठवणी पुन्हा कधीच पाहता येणार
नाहीत पण जर तोच फोटो जर तुम्ही
क्लाऊडवर अपलोड केलात तर तो
तुम्हाला कधीही जगाच्या कुठल्याही
कोपऱ्यातून मिळवता येऊ शकतो.
मोठी फाईल शेअर करणे हा
क्लाऊडचा सर्वात मोठा फायदा
समजला जातो. समजा, तुमच्याकडे
असलेला तुमच्या लग्नाचा व्हिडीओ
दूर राहणाऱ्या मित्राला दाखवायचा
आहे परंतु तुम्ही तो मेल करू शकत
नाही, कारण त्याला मर्यादा असते
मग अशा वेळी आपण आपला
व्हिडीओ क्लाऊडवर अपलोड
करायचा आणि त्याची लिंक
मित्राला पाठवायची आणि तुमचा
मित्र सहजरीत्या तो व्हिडीओ पाहू
शकतो. (तो ते क्लाऊड वापरत
नसला तरी हे शेअरिंग करता येते)
आपण सहा जण मिळून एखाद्या
प्रोजेक्टवर काम करीत आहात
आणि सगळ्यांना मिळून प्रेझेंटेशन
तयार करावयाचे आहे. परंतु आपण
सारे वेगवेगळ्या ठिकाणी राहत
असाल तर क्लाऊड तुमची मदत करू
शकतो. म्हणजे क्लाऊडवरच
प्रोजक्ट तयार करायचा आणि सहा
जणांना फाईल शेअर करायची.
प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार
त्यात हवे ते इनपुट्स देऊ शकतो
आणि त्यावर चर्चादेखील करू
शकतो.
मोठा बिझनेस असणाऱ्या कंपन्यांना
याचा खूप फायदा होतो. एकाच वेळी
अनेक ग्राहकांना सेवा सुरळीतपणे
पुरविण्यासाठी मोठमोठे सव्र्हर
मशीन्स एकाच वेळी चालविणं
गरजेचं असतं. ते कंपनीसाठी
अतिशय खर्चीक काम ठरतं, पण
क्लाऊडमुळे अनेक कंपन्यांचा
सव्र्हर चालविण्याचा व त्यांच्या
मेन्टेनन्ससाठीचा खर्च वाचविता
येतो. शिवाय क्लाऊड अॅक्सेसेबल,
तसंच  कमी खर्चीक असून, तो
पूर्ण कार्यक्षमतेने सेवा पुरवितो.
यामध्ये काही धोकेदेखील असू
शकतात पण त्यांचे प्रमाण फारच
कमी आहे.
क्लाऊड सुविधेसाठी पैसे मोजावे
लागतात का?
प्रत्येक वेळी नाही. म्हणजे
जवळजवळ सगळ्या क्लाऊड सुविधा
पुरविणाऱ्या कंपन्या आपल्या
युजर्ससाठी फ्री स्पेस देत
असतात त्यामुळे त्यांचे अॅप
डाऊनलोड करायचे. त्यांच्या
वेबसाइटवर लॉग-इन करायचे
आपला लॉग-इनआयडी आणि
पासवर्ड वापरून आपण कोणत्याही
डिव्हाइस (काही सुविधा विशेष
डिव्हाइससाठी सेवा पुरवितात) वरून
आपली माहिती अॅक्सेस करू शकता.
परंतु यामध्ये आपल्याला मर्यादित
मेमरी उपलब्ध होते ती वेगवेगळ्या
कंपन्यांची वेगवेगळी असते. उदा.
गुगल ड्राइव्ह आपल्याला १५ जीबी
मोफत जागा उपलब्ध करून देतो,
ड्रॉपबॉक्स आपल्याला दोन जीबी
जागा उपलब्ध करून देतो आणि
आपल्यामुळे एखादा मित्र ती
सुविधा वापरू लागला तर आपली
मेमरी लिमिट वाढविली जाते.
कशी करायची सुरुवात?
आपण सर्वप्रथम ठरवायचे की
कोणत्या कंपनीची क्लाऊड सुविधा
आपल्याला वापरावयाची आहे.
आणि त्यानुसार आपण त्यानुसार
आपण त्यांच्या वेबसाइटवर जाऊन
लॉग-इन करायचे. आपण अॅण्ड्रॉइड
वापरत असाल तर प्ले स्टोअर वरून
त्या कंपनीचे अॅप डाऊनलोड करून
घ्यायचे आणि आपले फोटो,
व्हिडीओ, महत्त्वाच्या फाईल्स
क्लाऊडवर सेव्ह करून आपण
कोठूनही अॅक्सेस करू शकतो. काही
महत्त्वाच्या कंपन्या आणि
त्यांच्या वेबसाइट्स, तसेच त्या
कंपन्या किती फ्री डेटा उपलब्ध
करून देतात याबद्दल-
गुगल ड्राइव्ह : सर्वात लोकप्रिय
आणि सर्वात उत्तम सेवा
पुरविणाऱ्यांपैकी एक म्हणजे गुगल
ड्राइव्ह. याच कंपनीने आताच गुगल
फोटोज सुविधा अनलिमिटेड
स्टोअरेज कॅपेसिटीसह उपलब्ध
करून दिली आहे परंतु गुगल
ड्राइव्हवर आपण सर्व प्रकारच्या
फाईल्स डेटा स्टोअर करू शकतो.
https://www.google.com/
drive/ -15gb
ड्रॉपबॉक्स : गुगल
ड्राइव्हप्रमाणेच सर्व प्रसिद्ध व
मुख्य म्हणजे सर्व प्रकारच्या
प्लॅटफॉर्मवरून सहज अॅक्सेसकरिता
येणारी सुविधा म्हणजे ड्रॉपबॉक्स
https://
www.dropbox.com/ – 2gb
मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह :
मायक्रोसॉफ्ट हे मोठे नाव असले
तरी यांच्या प्रायव्हसी
पॉलिसीनुसार कंपनीला वाटल्यास ते
तुमचा डेटा हवा तेव्हा मिळवू
शकतात. म्हणूनही बऱ्याचदा वन
ड्राइव्ह वापरणारे विचार करतात
परंतु जर आपली माहिती इतकी
काही गुप्त नसेल तर मायक्रोसॉफ्ट
वन ड्राइव्ह हा उत्तम पर्याय
आहे.
https://
onedrive.live.com/about/
en-us/ -15gb
कॉपी : वन ड्राइव्ह आणि
ड्रॉपबॉक्स प्रमाणेच कॉपीदेखील
सेवा पुरविते. याचे वैशिष्टय़ म्हणजे
आपण एखादी फाईल एखाद्या
व्यक्तीने फक्त वाचायची की
त्याला ती संपादित करण्याची
परवानगी द्यायची याचे नियंत्रण
आपल्या हाती असते.
https://www.copy.com/
page/
home;section:landing
-15gb
मेगा : ही कंपनी ही क्लाऊड सेवा
ग्राहकांना उपलब्ध करून देताना
सुरक्षिततेचे आणि गुप्तता
राखण्याचे वचन देते. आपण याचा
पासवर्ड चुकून विसरलात तर
आपण यावर साठविलेला डेटा
कधीच परत मिळवू शकत नाही,
कारण कंपनी आपल्या अकाऊंटचे
पासवर्ड लॉग-इन डिटेल्स
स्वत:कडे बाळगत नाही, असा
कंपनीचा दावा आहे. यावर बऱ्याच
लोकांनी टीका केली आहे, काहीही
असले तरी सध्या मोफत सर्वाधिक
स्टोरेज लिमिट मेगा आपल्याला
उपलब्ध करून देत आहे.
https://mega.co.nz/
-50gb
तर मग सुरू करा क्लाऊड
कॉम्प्युटिंग आणि व्हा बदलत्या
जमान्याचे साक्षीदार..

Saturday, 16 April 2016

संस्था सक्षमीकरन

          👉अतिशय महत्वाचे👈  
          ➖➖➖➖➖➖

🎾राज्याचे प्रधान सचिव,आपले प्रेरणास्रोत मा.नंदकुमार साहेब,यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने संस्थांचे सक्षमीकरण होत आहे.

वैशिष्ठे
👇�
☯पर्यवेक्षीय यंत्रनेचे सक्षमीकरण
शिक्षकांचे सक्षमीकरण:त्याना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम
दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रीया अधिक दर्जेदार करन्यासाठी शिक्षकांच्या गरजा ओळखुन प्रशिक्षण,

☯मानवी व भौतीक अध्ययन- अध्यापन स्रोतांचे विकसन व उपलब्धी,यासाठी सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.

 ☯११ डीसेंबर च्या पत्रानुसार १०० %पटनोंदणी,१00%उपस्थिती,व १00% विद्यार्थी प्रगती .
या परिपत्रकाची अमलबजावणी करन्यासाठी जे जे करता येइल ते ते करणे अपेक्षीत आहे.

 ☯जिल्ह्याच्या गुणवत्तेचे काम डायट करणार आहे .
scert ची  विभागनिहाय स्थापना
मुंबई नाशीक= मुंबई
नागपुर अमरावती साठी नागपुर औरंगाबाद सलंग संस्था.

☯तालुका स्तरावर ग शि अ च्या मदतीला एक असिस्टंट Beo चे पद निर्माण केले जातील.३३ डायट सलंग्नीत असतील.

☯SRP- Mcert राज्य संसाधन समुह
राज्य संसाधन समूह = कार्यक्रम उपक्रमशिल शिक्षकांचे व पर्यवेक्षणीय यंत्रनेतील,डायट अधिव्याख्याता यांची निवड,एकुण १० विषयासाठी प्रत्येकी १० ते  २० पदे.

☯विषय : भाषा ,इंग्रजी, गणित, विज्ञान,सा शा ,ict ,समावेशित शिक्षण,सह शालेय विषय समाज सहभाग बाल मानस शास्त्र व समुपदेशन

☯DRP= जिल्हा संसाधन समुह
डायटचा पुर्ण स्टाफ भरला जाईल .
विस्तारीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उपक्रमशिल शिक्षक,विषयसाधनव्यक्ती यांच्यामधुन चार विषयासाठी प्रत्येकी तीन व्यक्तींची निवड .
भाषा,इंग्रजी,गणित,जिल्ह्याची गरज लक्षात घेवुन एक विषय .

☯BRP=तालुकास्तरीय संसाधन समुह,Diet & beo
सहाय्यक गशिअ ( विस्तार अधिकारी)शिक्षक,केंप्र,सा व्यक्ती, यांच्यामधुन कार्यक्षम व्यक्तीची निवड होइल.सहा विषयासाठी प्रत्येकी तीन व्यक्तीची निवड शालेय विषय आणि ict

☯CRP= केंद्र संसाधन समुह : आवश्यकतेनुसार निमंत्रीत केले जाईल,शिक्षकामधुन पाच विषयासाठी प्रत्येकी दोन व्यक्तींची निवड केली जाईल,महिन्यातुन दोन दिवस कार्य करतील .
     या सर्वांचे विलक्षण ट्रेनिंग होणार आहे .
   या सर्व साधन व्यक्तीनी सर्व शिक्षकाना मागणीनुसार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करायचे आहे

ही पदे निर्माण होणार आहेत .

  अमलबजावणी :

शिक्षक निवड निकष : ६
वर्ग परिणाम,प्रशिक्षक म्हणुन अनुभव,विषय ज्ञान,कामाचा अनुभव,शैक्षणिक पात्रता,अभिवृती आणि मानसिकता,संस्थेच्या विकासाकरीता पार पाडावयाची भूमिका,या निकषामधुन पात्र ठरणा-या शिक्षकांची,विषयसाधनव्यक्तीची निवड होइल.

चला तर मंग🏃संधीचं सोनं करण्याची हीच खरी वेळ,राष्ट्र विकासाच्या कार्यात सहकार्य करण्याची हीच खरी संधी.
( चूक भूल असल्यास माफी असावी👏)

Saturday, 26 March 2016

रचनावाद

ज्ञानरचनावाद.... काय आहे आणि काय नाही?गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने वगैरे वापरून कृतियुक्त शिक्षण देणारे रचनावादाचे पुरस्कर्ते ‘आमच्या शाळेत आम्ही रचनावादी पद्धत वापरतो’ असे अभिमानाने म्हणताना दिसतात तर ‘रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्ही सांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिलेत’ असे काहीजण म्हणताना दिसतात. काहीजण ‘वर्तनवाद’ विरुद्ध ‘रचनावाद’ अशी मांडणी करताना दिसतात. या मतमतांतरांमुळे बर्याच जणांचा गोंधळ होणे साहजिक आहे. त्यातून या विषयावर मराठीतून फारसे वाचायलाही मिळत नाही. म्हणून या लेखात रचनावादाची नेमकी संकल्पना काय आहे याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, ही केवळ तोंडओळख आहे. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने अधिकचे वाचन करून, सहकार्यांशी चर्चा करून रचनावादाची पुरेशीसखोल समज बनवणे शिक्षक़ांसाठी अत्यावश्यक आहे. रचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. माणसाचे मूल कसे शिकते, या जुन्याच प्रश्नाचे नवे, अधिक विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न रचनावादाने केला आहे. मात्र अजूनही या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर आपल्या हाती आले आहे असे नाही. मात्र नवनव्या संशोधनांतून याविषयीच्या आपल्या ज्ञानात नित्यनेमाने भर पडत आहे हे नक्की. मुलांच्या शिकण्याबाबत रचनावादाचे काय म्हणणे आहे हे पाहण्याआधी, आपण शिकण्याबाबतचे रचनावादाच्या आधीचे सिद्धांतकाय होते हे पाहणे गरजेचे आहे. कोरी पाटी सिद्धांत ‘मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू’ (याचेच दुसरे रूप म्हणजे ‘मूल म्हणजे मातीचा गोळा’) असा सिद्धांत अनेक वर्षे रूढ होता. अजूनही त्याचे पडसाद कुठे क़ुठे ऐकायला मिळतातच. बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या ‘रिकाम्या’ मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना अनेक दिवस सर्वमान्य होती. पण हळूहळू लक्षात आले की प्रत्येक मुलाला ‘आपल्याला हवे ते, हवे तसे,हवे तेव्हा’ शिकवता येईलच असे नाही. एकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाच शिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीत. जर मुलांची मने म्हणजे कोर्या पाट्या असत्या तर मुलांच्या शिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही ! वर्तनवादाचा सिद्धांत - स्वरूप आणि मर्यादा मुलांच्या शिकण्याबाबतच्या अजून एका सिद्धांताचे अधिराज्य शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे राहिले. तो म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत. आजही शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत विस्ताराने अभ्यासला जातो. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्या अस्तित्वाचा व स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हते. बारकाईने बघितले तर आपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखेबांधतो ते त्याच्या वर्तनाच्या आधारे बांधतो. (उदाहरणार्थ, नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण ‘तो तोंड पाडून बसलाय’ ‘बोलत नाहीये’ असे त्याचे वर्तन पाहून बांधतो! कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.) त्यामुळे मग ‘वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र’ अशी व्याख्या केली जाऊ लागली. या व्याख्येच्या शास्त्रीय असण्याचा दबदबा इतका होता की मानसिक अवस्था वा प्रक्रियांबद्दल बोलणे अशास्त्रीय गणले जाऊ लागले. वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचे वर्तन आपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवले. वर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणि शिक्षा ! एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करत नाही अशी ही ढोबळ व सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग ‘मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिकणे’ अशी आपल्याला सुपरिचित असलेली शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली. वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सरावकरणे गरजेचे आहे हेही लक्षात आले. प्राणिल स्वरूपाच्या गोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यातवर्तनवाद कमालीचा यशस्वी झाला. मात्र माणसाच्या मुलाचे शिकणे प्राण्यांपेक्षा कमालीचे गुंतागुंतीचे असते. त्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागले. मूल मातृभाषा (खरे तर परिसर भाषा म्हणायला हवे !) कशी शिकते हे सांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागला. माणसाची भाषा ही एक अत्यंत गुंतागुंतीची चिन्हप्रणाली आहे. जगातल्या खर्या वस्तू, क्रिया, भावना, वस्तूचे गुणधर्म असे बरेच काही शब्दांच्या चिन्हांनी आपण दाखवत असतो. भाषेतील शब्द आणि तिच्या व्याकरणाचे नियम वापरून आपण मनातल्या मनात विचार करू शकतो. मातृभाषेचे नियम, व्याकरण, जटिल वाक्य-रचना एखादे दोनतीन वर्षांचे मूल कसे शिकते, भाषा वापरून आपण विचार कसा करू शकतो, याचे उत्तर वर्तनवादी सिद्धांताला देता येईना. आकलनवाद वर्तनवादी शास्त्रज्ञ भाषेकडे आणि विचारप्रक्रियेकडे फक्त एक वर्तन म्हणून पाहत असत. कारण विचार-प्रक्रिया अभ्यासायची तर मनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे अस्तित्व मान्य करायला लागणार आणि ते नाकारूनच तर वर्तनवादाची सुरुवात झाली होती! या प्रश्नावर तोडगा म्हणून आकलनवादी विचार मांडले गेले. ‘मूल भाषा कशी शिकते, हे केवळ अभिसंधान प्रक्रिया वापरून स्पष्ट करणे अशक्य आहे’ अशी मांडणी नोआम चॉम्स्कीसारख्या भाषातज्ज्ञाने केली. माणसाची विचारप्रक्रिया म्हणजे वर्तन नाही, तर विचारप्रक्रियेचा प्रभाव वर्तनावर पडतो. विचार- प्रक्रिया ही मानसिक पातळीवर चालणारी क्रिया असल्याने, आकलनवादासोबत मानसिक-अवस्था व मानसिक-प्रक्रिया यांना मानसशास्त्राच्या अभ्यासात परत स्थान मिळाले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की आकलनवाद्यांनी वर्तनवाद पूर्णपणे नाकारलेला नाही, मात्र तो शिकण्याची समग्र प्रक्रिया उलगडण्यास तोकडा आहे, असे सप्रमाण दाखवून दिले आहे. ज्ञानरचनावाद मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया यांचा अभ्यास करणे मानसशास्त्रात पुन्हा एकदा दाखल झाल्यावर, शिकण्याची प्रक्रिया काय आहे हे उलगडून दाखवण्याला बराच वेग आला. त्यातूनच ज्ञानरचनावादाची कल्पना पुढे आली. मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा आणिपरिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्या ज्ञानाची रचना करत असते असा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहे. मूल आपल्या ज्ञानाची रचना कशी करते यावर ज्ञानरचनावाद बराच प्रकाश टाकतो. मूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करते. वस्तू मुठीत पकडणे , तोंडात घालणे, वस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपड आहे असे ज्ञानरचनावादात मानले जाते. एकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचनाकरण्याला मोठीच गती मिळते. शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढलाकी बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्याने बनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकते, याचे पियाजेंनी दिलेले उदाहरण आपण पाहू या. अर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहे

Monday, 7 March 2016

पॉवल अॉफ चॉइस

पॉवर ऑफ चॉइस-

सुप्रसिद्ध साहित्यीक चेतन भगत याने सांगीतलेला हा किस्सा आहे.

मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’

‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षीतपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती.

वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’

मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’

‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’

‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेर्याावरचे आश्चर्य काही लपत नव्हते.

माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’

मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टाक्सी सुरु करातताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगीतले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहीती दिली.

‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.

‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’

वासुच्या चेहेर्याेवर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासुनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’

‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणार्याी सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला

‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजुबाजुला निरिक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.

‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगु लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचीत माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

गरुड व्हा, बगळा होऊ नका!

वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.

बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत!

आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का?

तुम्हाला काय वाटते?

Thursday, 3 March 2016

एक अद्भुत गंमत
एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे

अग कमल उठ पाय धु  , रस ,भजॆ ,चहा बनव.

अ:- अकोला, अमरावती, अॊरंगाबाद, अहमदनगर
ग:-गङचिरोलि,गोंदिया
क:- कोल्हापूर
म:- मुंबई
ल:- लातूर
उ:- उस्मानाबाद
ठ:- ठाणे
प:- पालघर, पुणे, परभणी
य:- यवतमाळ
धु :- धुळे
र:- रायगड, रत्नागिरी
स:- सांगलि,सातारा, सोलापूर,  सिंधुदूर्ग
भ:- भंङारा
ज:- जळगाव,जालना
च:- चंद्रपूर
ह:- हिंगोलि
ब:- बिङ, बुलढाणा
न:- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबाद
व:- वर्धा, वाशिम
http//junipension.blogspot.in
अवश्य भेटा Dcps बंधुनो

Wednesday, 2 March 2016



💻💻चला ज्ञानरचनावादाने प्रगत महाराष्ट्र बनवूया💻💻
 💎💎💎💎💎💎💎💎
👉🏻 राष्ट्रीय विज्ञान दिन व डॉ.सी.व्ही.रमन यांच्या संपूर्ण माहितीसाठी...

http://goo.gl/1iFA0h

👉🏻 परिपाठातील सर्व गीते mp3 मध्ये Direct डाउनलोड करण्यासाठी ....

http://goo.gl/MjYdxB

👉🏻ज्ञानरचनावाद,ज्ञानरचनावादी साहित्य तयार करण्याया कृती, खेळ व फोटो इ.माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://goo.gl/NAdzD9

👉🏻शोध विभाग-प्लास्टिक आधार कार्ड,शाळेचा u-dise नंबर इ.साठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://goo.gl/49PldL

👉🏻टेक्नॉलॉजी -अॉनलाईन टेस्ट निर्मिती ,computer वर Android app इ.साठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://goo.gl/VgEBXK

👉🏻शिक्षकांसाठी- व्याकरण,7व्या आयोगानुसार पगार,D.A.व गटविमा लागू दिनांक इ.साठी खाली क्लिक करा.

http://goo.gl/YwE2oO

👉🏻विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थी लाभाच्या योजना,शै.Apps इ.साठी खाली क्लिक करा.

http://goo.gl/UNKOJc

👉🏻डाउनलोड - सर्व वर्गाच्या कविता व Rhymes इ.साठी Drop down मेनूतील हाव्या त्या Tabवर क्लिक करा.

👉🏻महाराष्ट्रातील - किल्ले ,जिल्हे,संवर्गनिहाय  जातीची यादी इ.साठी महाराष्ट्रातील drop down मेनूवर क्लिक करा.

👉🏻वाचाणीय - pdf पुस्तके ,rte मराठीत इ.साठी वाचणीय drop down मेनूवर क्लिक करा.

⚡शिक्षकांसाठी-सर्व वर्गासाठीच्या वर्णनात्मक नोंदी व इतर उपयोगी माहितीसाठी.

http://goo.gl/9aAw6H

🔊 दर महिन्याला लागणारे शालेय पो.आ.खर्च मागणी software डाउनलोड करा.

http://goo.gl/HxcNvg

💎 विषयांची संपूर्ण माहिती-विषयांच्या वेबसाईट,1ते7 साठी गणित विषयाचे उपक्रम व खेळ इ.साठी

http://goo.gl/WSSdJ9

🚀 विज्ञान खेळणी व प्रयोग यासाठी...

http://goo.gl/a5AmUu

🚀 Income tax काढण्यासाठी software साठी....

http://goo.gl/D6u7Iq

🚀 ब्लॉग बनवण्यासाठी- Direct download link देणे ,ब्लॉग कसा बनवावा,running text,drop down मेनू इ.साठी...

http://goo.gl/Bv3oKT

📝 दर महिन्याला लागणारे प्रपञ pdf मध्ये डाउनलोड करा....

http://goo.gl/KL4JEK

👉🏻 5 ते 8 साठी गणित विषयाच्या अॉनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी

http://goo.gl/oCZjGS

👉🏻 जादूचे प्रयोग मुलांना दाखवण्यासारखे ...

http://goo.gl/MZSe1r

👉🏻 आदर्श प्रकल्प नमुने डाउनलोड करण्यासाठी

http://goo.gl/Dh1Ku8

👉🏻 गणितातील गमती जमतीसाठी

http://goo.gl/QBl6c7


B S K

==💻==Ⓜ🅰🅿==💻==

whatsapp अपडेट करा व pdf file save करा

☣♍🅰🅿🕎Ⓜ🅰🅿
व्हाट्स अप अपडेट करा व pdf फाईल शेअर करा.

📲 'व्हॉटस्‌अॅप’ वरून पाठवू शकता पीडीएफ फाईल !

📰 byमाझा पेपर on March 2 2016, 6:47pm

🕹माऊंटेन व्ह्यु : आता लवकरच ‘व्हॉटस्‌अॅप’द्वारे पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविणे शक्य होणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून संदेशांद्वारे टेक्स्ट, फोटोज्‌, व्हिडिओज्‌ आणि फोन क्रमांकही पाठविता येतो. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे डॉक्‍युमेंट पाठवण्याची सोय नव्हती, ती सेवा आता व्हॉटसअॅपद्वारे देण्यात येणार आहे.

ही सुविधा व्हॉटसअॅपच्या स्पर्धेत असलेल्या इतर इन्स्टंट मेसेंजिंग अॅपमध्ये आहे. त्यालाच टक्कर म्हणून ‘व्हॉटस अॅप’ही पीडीएफ फाईल पाठविण्याची सेवा देवू केली आहे. पीडीएफशिवाय आता पुढील काळात आणखी नवी सेवा व्हॉटस अॅप देणार का? याकडेही लक्ष आहे. व्हॉटस्‌अॅपच्या पुढील अपडेटेड व्हर्जनमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र हे व्हर्जन अद्याप अधिकृतरित्या उपलब्ध झालेले नाही. लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. त्यानंतर त्याबाबतची सूचना व्हॉटस्‌ अॅपद्वारे येणार आहे.
☣♍🅰🅿🕎Ⓜ🅰🅿

💡 ज्ञानरचनावाद समजून घेऊन त्याचा प्रत्यक्ष वापर करुया 👇🏻
http://goo.gl/jizYQx

⭕♍🅰🅿⭕♍🅰🅿

school upkram

 Cards for learning English







school upkram